स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभापती निवडणुक दि.४ मार्च रोजी होणार आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सभापती निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्थायी समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला.

दरम्यान राष्ट्रवादीकडून या पदासाठी अविनाश घुले यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. घुले यांनी नगर सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

नगर सचिव एचडी तडवी यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारला. अविनाश घुले यांच्या एका अर्जाला बसपाचे मुदस्सर शेख हे सूचक आहेत,

तर अनुमोदक राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे हे आहेत. दुसऱ्या उमेदवारी अर्जाला राष्ट्रवादीचे सागर बोरुडे हे सूचक असून काँग्रेसच्या सुप्रिया जाधव या अनुमोदक आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe