लष्कर भरती घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई, लष्करी कर्मचाऱ्यासह चौघे ताब्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- लष्कराच्या गुप्त माहितीवरून विश्रांतवाडीत छापे टाकून लष्कर भरतीचा लेखी पेपर देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळण्याचे प्रकरण ताजे असताना याच प्रकरणात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

यात २ लष्कर कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांना पकडले आहे. याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

किशोर महादेव गिरी (वय ४०, रा. लकडे नगर, माळेगाव, बारामती), कुमार परदेशी (रा. फलटण जिल्हा सातारा), योगेश उर्फ गोट्या शंकर गोसावी (रा. माळेगाव, बारामती) आणि भरत ( पूर्ण नाव माहीत नाही) अशी चौघांची नावे आहेत.

वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी लष्करात भरतीसाठी लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून, लाखो रूपये उकळणार्‍या टोळीचा लष्कराची गुप्तचर संस्था आणि पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने नुकताच पर्दाफाश केला होता. परत या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe