अबबब ! या ठिकाणी  पेट्रोलने भरल्यात विहिरी  

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-  दिवसेंदिवस पेट्रोलचे दर गगनाला भिडले असून,ते अजूनही वाढतच आहेत. या वाढलेल्या दराने सर्वसामान्यांच जीव मेटाकुटीला आला आहे.एकीकडे एक लिटर पेट्रोलसाठी १०० रुपये मोजावे लागत असताना दुसरीकडे चक्क पेट्रोलने चक्क विहीर भरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सासवड येथे समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेहणारी उच्च दाबाची पाइपलाइन फोडली आणि दोन हजार लिटर पेट्रोल लंपास केले. यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील २२३ किलोमीटरच्या पाइपलाइनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठे भगदाड पाडले.

मात्र पाइपलाइन फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोल वाहून गेले. त्याचसोबत लाखो रुपयांचे हजारो लिटर पेट्रोल जमिनीत मुरल्यामुळे या भागातील विहिरी पेट्रोलने भरल्या आहेत. तसंच जमिनीत मुरलेल्या प्रेट्रोलमुळे अनेक एकर शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालं आहे.

विहिरीतील मासे आणि बेडूक, तसंच परिसरातील साप मृत झाल्यामुळे हा प्रकार समोर आला.  नंतर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत भगदाड बंद करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe