अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- सहकारी प्राध्यापिकेला अश्लील चित्रफितीची लिंक पाठवणं प्राध्यापकाला चांगलंच महागात पडलं आहे. आरोपी प्राध्यापकाला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात नोव्हेंबर 2017 मध्ये हा प्रकार घडला होता.
बीड शहरातील एका शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या गजानन करपे याने याच महाविद्यालयातील प्राध्यापिकेला व्हॉट्सअपवरुन अश्लिल व्हिडीओ असलेली लिंक पाठविली. नोव्हेंबर २०१७ मध्ये घडलेल्या या प्रकारावरुन महाविद्यालय प्रशासनाने गजानन करपे यास निलंबीत केले होते.
नंतर या प्राध्यापिकेस रस्त्यात आडवून जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यामुळे विनयभंग केल्याची फिर्याद पिडीतेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. तत्कालिन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी तपास करुन दोषारोपपत्र सादर केले.
पुराव्यांच्या अधारे विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांनी गजानन करपे यास दोषी ठरवत त्यास पाच वर्षे सश्रम कारावास व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|