अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- माजी खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार न देता शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी पक्षाकडे केली आहे.
अर्थात ज्या जागी ही पोटनिवडणूक होत आहे ती जागा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अपात्र ठरविल्यामुळे रिक्त झालेली आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये ही पोटनिवडणूक होत आहे. तेथून अपक्ष म्हणून आलेल्या छिंदमला अपात्र ठरवून ते पद रद्द केले.
त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर गांधी यांनी पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्याकडे केलेली मागणी लक्षवेधक ठरत आहे.
गांधी यांनी म्हटले आहे की, प्रभाग ९ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार न देता विक्रम राठोड यांना पाठींबा द्यावा, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कडेही करणार आहे,’ असेही गांधी म्हटले आहे.
या मागणीवर भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. शिवाय स्वत: राठोड यासाठी तयार आहेत का? छिंदमची भूमिका काय असेल?
महापालिकेत भाजपला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही यासाठी लक्षात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे गांधी यांच्या पत्रामागील नेमका हेतू काय असावा, याबद्दल तर्क विर्तक लावले जाऊ लागले आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|