वीजकपात दोन टक्के नव्हे, तर दोन पैशांचीच !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- राज्य सरकारने एक एप्रिलपासून वीज दरात प्रति युनिट दोन टक्के कपात करण्याचा निण्र्य घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात सर्व वीज ग्राहकांचा सरासरी बिल दर ७.२८ रुपयोवरुन ७.२६ रुपये प्रति युनिट होणार अाहे.

सरासरी कपात दोन पैसे प्रति युनिट म्हणजे ०.३ टक्के होणार आहे. त्यामुळे वीजकपात दोन टक्के नव्हे, तर दोन पैशांचीच होईल, नवीन काहीही घडलेले नाही, असे मत राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व शेती पंप या सर्व वर्गांचे वीजदर देशात सर्वात जास्त असताना ०.३ टक्के कपात काहीच नाही. प्रशासकीय खर्चात कपात व २४ तास वीज देण्याच्या महत्वाच्या आव्हानांकडे राज्य सरकार, आयोग व कंपनी यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा होगाडे यांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकार, असो वा महावितरणने नवीन काही केलेलं नाही. आयोगाने गेल्यावर्षीच पुढील पाच वर्षासाठी बहुवर्षीय दरनिश्चिती आदेश जाहीर केला आहे. त्यामधील ही आकडेवारी आहे. काही ठराविक वर्गवारीतील ग्राहकांचा एकूण सरासरी देयक दर एक ते चार टक्के कमी झाला आहे.

एकूण घट, कपात ही फक्त सरासरी दोन पैसे प्रति युनिट म्हणजे ०.३ टक्के इतकीच आहे. तसेच, इंधन समायोजन आकाराचे अद्याप प्रमाणीकरण व निर्धारण व आकारणी झालेली नाही. ती झाल्यानंतरच कपात की वाढ हे चित्र स्पष्ट होणार आहे.

एप्रिल २०२२ नंतर महावितरण फेरआढावा याचिका दाखल केल्यावर २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षात वीज ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा फटका बसणार हे निश्चित आहे, असे होगाडे म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News