बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना फायदा,शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-राहाता तालुक्यातील कातनाल्यात बंधारे झाल्याने विहिरींतील पाण्याची पातळी टिकून राहून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे प्रतिपादन राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी केले.

लघु व पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत, जिल्हा परिषदेमार्फत व राहाता नगरपालिकेच्या सहकार्याने बंधाऱ्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.

याप्रसंगी नगराध्यक्ष पिपाडा बोलत होत्या. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, गटनेते ॲड. विजय सदाफळ, रेवननाथ दंडवते, बाळासाहेब बोठे, सचिन बोठे, नितीनराव कापसे, भागवतराव आरणे, सुनिल वैभववाले, नाना हिंगे, सुधाकर बोठे, सविता बोठे आदी उपस्थित होते.

पढे बोलताना पिपाडा म्हणाल्या, शालिनीताई विखे या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना या बंधाऱ्याच्या कामाला मंजुरी मिळालेली होती.

नगरपालिका हद्दीत कातनाला असल्याने पिपाडा यांनी तात्काळ मान्यता दिली होती. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe