मुख्याध्यापकाने शाळेला लावला चुना ! चक्क शिकवणी व बस फी च्या रकमेचा केला अपहार

Ahmednagarlive24
Published:

पाथर्डी :- शहरातील श्रीतिलोक जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुमारे पावणे नऊ लाख भरलेली शिकवणी व बस फी घेऊन मुख्याध्यापकाने संस्थेला चुना लावला. मुख्याध्यापक पसार झाला असून त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरूवारी अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

श्री तिलोक जैन इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत नर्सरीपासून चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. संचालक मंडळाने २०१७ पासून अनिल बंडीवार यांना मुख्याध्यापक म्हणून नियुक्त केले होते. विद्यार्थ्यांची शिकवणी फी व बसभाडे आकारण्याचे अधिकार बंडीवार यांना होते. २०१८-१९ या वर्षात विद्यालयात १९८ विद्यार्थी शिकत होते.

या विद्यार्थ्यांची शिकवणी फी व बस भाडे असे मिळून २१ लाख ९५ हजार संस्थेच्या खात्यात जमा होणे आवश्यक होते. शाळेच्या दर्जाबाबत व मुख्याध्यापकांच्या वर्तनाबाबत पालकांनी तक्रार केल्यानंतर संस्थेच्या विश्वस्त मंडळाने चौकशी करून मुख्याध्यापक बंडीवार यांची पदावनती करून त्यांच्या जागी नवीन मुख्याध्यापकांची नियुक्ती केली.

मात्र, नवीन मुख्याध्यापकाला बंडीवार यांनी पैशांचा हिशेब व चार्ज दिला नाही. हिशेबाची पडताळणी केली असता बंडीवार यांनी २०१८ -१९ या शैक्षणिक वर्षात दोन लाख ५३ हजार ८५५ रुपयांचा अपहार केल्याचे लक्षात आले.

२०१९ – २० या शैक्षणिक वर्षात शाळेत २२३ विद्यार्थी शिकत होते. त्यांच्या शिकवणी फी व बसभाड्यापोटी मिळालेल्या रकमेतून बंडीवार यांनी ६ लाख २३ हजारांचा कागदोपत्री अपहार केल्याचे उघड झाले.

याबाबत संस्थेच्या सभासद मंडळाने बंडीवार यांना कार्यालयात हजर राहून हिशेब देण्यास सांगितले. मात्र, बंडीवार हजर राहिले नाहीत. त्यांनी शहरातून पलायन केल्याचे लक्षात आले. संस्थेचे सचिव सतीश गुगळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी बडिवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment