‘त्या’आगीत दुकानातील सर्व हेल्मेट जळून खाक !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  एका हेल्मेटच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून ‘त्या’ दुकानातील सर्व हेल्मेट खाक झाले. ही घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील एआयपीटी समोर घडली.

दिपक हेल्मेट असे या दुकानाचे नाव असून, रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत दुकानातील सर्व हेल्मेट जळून खाक झाले, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

आग लागल्यानंतर हडपसर येथील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यास सुरुवात झाली. त्यादरम्यान कोंढवा व कँन्टोमेंट भागातूनही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

पंधरा ते वीस मिनिटामध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली, अन्यथा मोठी समस्या निर्माण झाली असती.

या दुकानासमोर दोन ते तीन चारचाकी वाहने होती. या वाहनाना मागच्या बाजूने थोड्या प्रमाणात आगीची झळ बसली आहे. आग लागली त्या दुकानाच्या दोन दुकाने सोडून फटाक्याचे दुकान आहे.

वेळीच अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण समजले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe