आमदार काळेंच्या प्रयत्नातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणेबाबत शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला अखेर त्या पाठपुराव्याची दखल घेऊन आरोग्य मंत्रालयाने माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास नुकतीच मंजुरी दिली आहे.

जवळपास 10 ते 12 गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने माहेगाव देशमुख येथे प्राथमिक केंद्रास मंजुरी दिली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव तालुक्यात पोहेगाव, वारी, संवत्सर, दहेगाव बोलका, टाकळी, ब्राम्हणगाव, चासनळी असे एकूण 6 प्राथमिक आरोग्य केंद्र व 31 प्राथमिक उपकेंद्र आहेत.

माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणार असल्यामुळे कोळपेवाडी, कोळगाव थडी, सुरेगाव, शहाजापूर, मळेगाव थडी, कुंभारी, धारणगाव,

हिंगणी, मुर्शतपूर, सोनारी आदी गावातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या नागरिकांना मोफत रुग्णसेवेचा लाभ होणार आहे.

सर्पदंश, श्वानदंश लस तसेच विविध लसीकरणासोबतच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राचा मोठा उपयोग होणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News