अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- १४ मार्च रोजी होणारी MPSC ची पूर्व परीक्षा अवघ्या ३ दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळू लागला होता. एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले.
त्या प्रश्ना वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असून येत्या आठ दिवसांच्या आत MPSC ची पूर्व परीक्षा घेतली जाईल
आणि त्याच्या तारखेची घोषणा १२ मार्च म्हणजे शुक्रवारी जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.
पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सकाळपासून आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात का असेना,
पण दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या आठ दिवसांत परीक्षा होतील हे वचन देतो, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
उद्याची परीक्षा पुढे ढकलण्यामागे कोरोनाचा हाच कारण आहे. आपल्याला कल्पना असेल या परीक्षेला संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते. त्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार. कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय.
त्यामुळे जे कर्मचारी परीक्षेसाठी काम करणार आहेत त्यांची टेस्ट केली जाणं महत्त्वाची आहे. ज्यांना लस दिली गेलीय तेच कर्मचारी यासाठी काम करतील, असा माझा आग्रहच नव्हे तर सूचना आहे. विद्यार्थी परीक्षेत आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नयेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|