अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- सध्या जिल्ह्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दररोज कुठेना कुठे चोरी, दरोड्याच्या घटना घडत आहेत. यात चोरटे तर कोणती चोरतील याचाी काही खात्री देता येत नाही.
अशीच घटना नगर तालुक्यातील सारोळा बध्दी या गावात चक्क ४०७ टेम्पोच चोरून नेला आहे.
याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील सारोळा बध्दी येथे फिर्यादी महावीर कांतीलाल गांधी यांचे स्वस्तीक एजन्सी नावाने दुकान आहे.
दि.९ रोजी गांधी यांनी त्यांच्या दुकानासमोर (एमएच २७ एफ५६०६) या क्रमांकाचा ४०७ टेम्पो लावला होता. मात्र अज्ञात चोरट्यांनी तो लांबवला.
याप्रकरणी गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोना.पालवे हे करत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|