चंद्रकांतदादा म्हणतात, झोपेचं सोंग घेतलेल्या ‘या’ सरकारला जाग कधी येणार?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-  राज्यात सुरु असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या तेव्हा १०-१२ दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पूजा चव्हाणसारख्या घटना स्मरणात आल्या.

ठाकरे सरकार यावर कधी गांभीर्याने लक्ष देणार? या सर्व गोष्टींची सरकार गंभीर दखल कधी घेणार? झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार?,” असे प्रश्न भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना ट्विटद्वारे केले आहेत.

या ट्विटमध्ये पाटील यांनी म्हटले आहे की, आज रविवार. आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती,पण राज्यात सुरु असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या तेव्हा १०-१२ दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पूजा चव्हाणसारख्या घटना स्मरणात आल्या.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून १२ मार्चपर्यंत घडलेल्या महिला अत्याचाराच्या काही घटनांकडेही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी अशा मथळ्याखाली हा काही घटनांचा उल्लेख पाटील यांनी केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe