साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांची नियुक्ती पुन्हा अडचणीत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती आयएएस नसतांना दिली असून ती नियमबाह्य असल्याचे सांगत औरंगाबाद खंडपिठाचे उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत सनदी अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहे.

मा उच्च न्यायालयात शिर्डी येथील माजी विश्वस्त श्री उत्तमराव शेळके यांनी नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती.

त्यावर अंतिरीम आदेशान्वये मा उच्च न्यायालयाने, प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर, अतिरिक्त आयुक्त नाशीक , सह धर्मदाय आयुक्त नगर व मुख्य कार्यकारी अधिकारी शिर्डी यांची तद्थ समिती गठीत करून त्यांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार व आदेश दिले होते.

व त्या नुसार सदर समिती आजवर साईबाबा संस्थानचे काम पहात आहे. शिर्डी येथील माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी साईबाबा संस्थान विश्वस्त मंंडळ नेमण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बगाटे आयएएस अधिकारी नसताना त्यांची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बगाटेे यांची आयएएस पदोन्नती झाली.

सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सरळ नेमणुकीचे आयएएस अधिकार्‍याची साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आदेश झाले होते.

बगाटे मुख्य कार्यकारीपदी नेमणुकीच्या वेळी आयएएस अधिकारी नसताना अधिकारी झाले असल्याने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होतो,

त्यामुळे सरळ नेमणुकीच्या आदेशानुसार आयएएस अधिकारी साईबाबा संस्थानवर मुख्य कार्यकारी अधिकारी नेमावा, असा विनंती अर्ज याचिकाकर्ते श्री. शेळके यांच्या वतीने करण्यात आला होता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe