आता या तालुक्यात बिबट्याचा संचार ! परीसातील नागरिक भयभीत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे  आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील शेतकरी शेतातील कामे करण्यासाठी घराबाहेर पडण्यास घबरात आहेत.

वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी कोरेगव्हाण परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. कोरेगव्हाण येथील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा बिबट्याने पाडला आहे.

या परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस तुटून गेल्याने बिबट्याला निवारा राहिला नसल्याने बिबट्याने नागरी भागात आपला मोर्चा वळवला आहे. मागील आठवडाभरापासून ह्या परिसरात बिबट्यांची दहशत वाढलेली आहे .

त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर तसेच व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा  केला असल्याने

परिसरातील शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी रात्री – अपरात्री जावे लागते. त्यातच परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने  शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात जाण्यास घबरात आहेत.

रात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना बिबट्यांचे दर्शन झाल्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर जाण्यास घाबरत आहेत. वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी कोरेगव्हाण परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe