अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये करोनाचा वेगाने फैलाव होत असून त्यात संगमनेर तालुका पहिल्या तीनमध्ये आहे. रोज रुग्णसंख्येचे विक्रमी आकडे समोर येत असल्याने तालुक्यात पुन्हा एकदा करोना सक्रिय झाला आहे.
त्यामुळे शहरातील सर्व खासगी रुग्णालये तुडूंब झाली आहेत. तालुक्यातील अधिकृत मृतांचा आकडा दोनने वाढून आता 62 झाला आहे.
संगमनेर तालुक्यातील माळेगाव हवेली येथील एक 70 वर्षीय महिला तर वडगावपान येथील 55 वर्षीय पुरुष यांना करोनाची बाधा झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यामुळे तालुक्यातील करोना बळींची संख्या 62 वर गेली आहे. तर काल नव्याने 43 करोना बाधित आढळून आले आहेत. फेब्रुवारीनंतर वाढत कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता विनाकारण घराबाहेर पडणे टाळा,
कुठेही जास्त गर्दी करू नका, काही लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या शासनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|