रोहित पवार म्हणाले…एका जबाबदार मंत्र्याने राज्य सरकारला दोषी धरणे चुकीचे आहे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना आता लसीकरणावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ ४४ टक्के लसीचे लसीकरण झाले असून ५६ टक्के लस पडून राहिली असा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला.

जावडेकरांच्या या आरोपाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियाद्वारे उत्तर दिले आहे. जावडेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले, राज्याला आपल्या मनाप्रमाणे लसीचा वापर करता येतो, असे नाही तर तज्ज्ञ गटाने ठरवून दिलेला प्राधान्यक्रम आणि नियोजनानुसारच लसीकरण केले जाते.

राज्याकडे लसींचा साठा असला तरी तो परस्पर वितरीत करता येत नाही. यासाठी एका जबाबदार मंत्र्याने राज्य सरकारला दोषी धरणे चुकीचे आहे,’ असे उत्तर पवार यांनी दिले आहे. ‘केंद्र सरकारने अधिकाधिक गटांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी आणि त्यासाठी डोस उपलब्ध करून द्यावेत,

यासाठी जावडेकरांनीच केंद्राकडे प्रयत्न करावेत,’ असा सल्लाही त्यांनी दिला आहे. “महाराष्ट्रातील घनता लक्षात घेता कोरोनाचे प्रमाण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यात सरसकट लसीकरण होणे आवश्यक आहे. मात्र, जावडेकरांनी याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या मातृराज्यावर टीका केली.

कोरोनाच्या बाबतीत राज्य सरकार काळजीपूर्वक आणि प्रभावी काम करत असतानाही जावडेकर यांच्या आरोपामुळे लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून काही गोष्टींना समोर आणणे गरजेचे वाटते”, असे रोहित पवार यांनी नमूद केले आहे.

महाराष्ट्र हे देशाचं इंजिन असून कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण कार्यक्षमतेनं सुरू रहाणं आवश्यक आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं राज्यात सार्वत्रिक लसीकरणास परवानगी द्यावी आणि लसींचे पुरेसे डोसेसही उपलब्ध करून द्यावेत. त्यासाठी जावडेकरांनी प्रयत्न करावेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर