रस्त्याच्या डांबरीकरणास विरोध केल्याने तिघांवर गुन्हा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- रस्त्याचे डांबरीकरण करण्यास विरोध केल्याने येथील तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शिर्डी नगरपंचायतीचे कर्मचारी सुरेश अमोल बत्तीसे हे दि. २० मार्च रोजी शिंदे-शेळके वस्तीलगत रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी गेले होते.

याठिकाणी रस्त्याचे काम सुरू केले असता त्या ठिकाणी राहणारे किरण संपत शेळके, रवींद्र संपत शेळके, दिगंबर संपत शेळके या तिघांनी जेसीबी व ट्रॅक्टरला आडवे येऊन, ‘आमच्या शेतीजवळ काम करायचे नाही’,

असे म्हणून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. बत्तीसे यांच्या या फिर्यादीवरून या तिघा आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरपंचायतचे मुख्यधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्याशी संपर्क साधला असता विविध विकासभिमुख कामांना पंचायतीने प्राधान्य दिले आहे;

मात्र विकासकामात कोणी अडथळा आणला, तर कारवाई करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला असून नागरिकांनी नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe