मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना पोलिसांचा हिसका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-शहरातील वाढती गुन्हेगारी व शाळा कॉलेजमधील मुलींच्या छेडछाडीच्या प्रकारातून रोडरोमिओंचा वाढता सुळसुळाट याचा बिमोड करण्यासाठी खाकी आता आक्रमक झाली आहे.

कर्जत येथील शाळा, महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण भरधाव वेगाने मोटरसायकल चालविणारे, शाळेचा गणवेश व ओळखपत्र न बाळगता फिरणारे, टवाळखोरी करणारे,

मुलींची छेड काढण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्यांना कर्जत पोलिसांनी चांगलीच हिसका धाकवला आहे. आज पोलिसांनी दादा पाटील महाविद्यालय, डायनॅमिक कॉलेज व इतर ठिकाणी टुकारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.

या मुलांना पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणले. त्यांच्या पालकांना बोलावून घेवून मुलांवर कारवाई केली. त्यांना सुधारण्यासाठी ताकीद देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान शाळा, कॉलेज परिसर,

बसस्थानक परिसर, बसमध्ये चढताना उतरताना किंवा बस प्रवासात कोणी टुकारपणा करताना आढळून आल्यास तात्काळ कर्जत पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe