खुशखबर !! यंदा चांगला पाऊस पडेल  ‘या’ देशाच्या हवामान खात्याचा अंदाज 

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- यावर्षी भारतात सर्वसामान्य पाऊस पडेल, असा अंदाज ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडेल. ऑस्ट्रेलियाचे हवामान खातं हे त्याच्या अचूक अंदाजासाठी जास्त प्रसिद्ध आहे.

जर हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरला तर शेतकर्‍यांच्या आनंदाबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील याचा फायदा होणार आहे. मात्र भारतीय विभागाकडून अद्याप हवामान विभागाबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही.

कदाचित एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय एक्यूवेकर या वेदर कंपनीने देखील भारतात यावर्षी दुष्काळ पडणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे.

भारतात अनेक ठिकाणी मे महिन्याच्या सुरुवातीला पेरणीला सुरुवात केली जाते. यावर्षी जर मान्सुन पूर्व काळात चांगला पाऊस पडला तर शेतकर्‍यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. याशिवाय शेतकर्‍यांना त्यांचं शेत तयार करण्यासाठीही चांगली मदत होईल.

याशिवाय त्यांना पाण्यासाठी लागणारा खर्चही वाचेल. योग्य वेळी पेरणी झाली तर चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता वाढते. जर असे झाले तर शेतकर्‍यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, मान्सून यावर्षी धोका देणार नाही, अशी वैज्ञानिकांनादेखील आशा आहे. पाऊस कमी-जास्त पडला तर त्याचा थेट परिणाम खेड्या गावात राहणार्‍या नागरिकांवर पडतो. त्यामुळे पाऊस चांगला किंवा सामान्य स्वरुपाचा पडला तर शेतकर्‍यांना दिलासा मिळतो.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News