अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नगर जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुश्रीफ नगरला आले होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मुश्रीफ म्हणाले कि, ‘तज्ज्ञांनी वर्तविलेल्या दुसऱ्या लाटेतील संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज आहे. योग्य ते उपाय करण्यात येत असल्याने लॉकडाऊनची सध्या तरी गरज वाटत नाही.

‘ गेल्या वेळी लोकांच्या मनात करोनाची भीती होती. यावेळी तशी भीती राहिलेली नाही. लोक बिनधास्त फिरत असल्याने संसर्ग वाढतो आहे. तर केंद्र सरकार लसीकरणासाठी विविध बंधने घालीत आहे.
अशी बंधने नकोत, लसीकरण सर्वांसाठी खुले करा. येईल त्याला टचाटच लस टोचा. नंतर जे राहतील त्यांनाही शोधून लस द्या, अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे करीत असल्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
लसीकरणासंबंधी ते म्हणाले, लसीकरण करण्यात आपण आघाडी घेतली आहे. अमेरिकेत असेच मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले. त्यामुळे तेथील लोक आता विनामास्क फिरू शकत आहेत. आपल्याकडेही वयाचे बंधन काढून टाकले पाहिजे.
लस सरकारी दवाखाण्यात आणि बाजारातही उपलब्ध करून दिली पाहिजे. ज्यांना शक्य आहे, ते विकत घेतील. ज्यांना शक्य नाही, ते सरकारी दवाखान्यातून घेतील. राज्यातील स्थितीतबद्दल बोलताना ते म्हणाले,
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अधिक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र, लोक प्रतिसाद देत नाहीत. पुढील शंभर दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. करोनाची ही दुसरी लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. असे मुश्रीफ म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
 - अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
 













