अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे मालवाहू ट्रकने पेट घेतल्याने त्यामुळे ट्रकमधील लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाले आहे.
यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मालवाहू ट्रक क्रमांक (आर जे १४ जीजे ३९७१) हीच्यावरील चालक विजय नारायण डुबे हा पुणे येथून
लॅपटॉपसह आदि साहित्य घेवून गुडगाव हरियाणाकडे जात असताना वडगाव फाट्यावर आला असता या मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतला.
चालकाने सावधानता बाळगत हा ट्रक शेताजवळ नेला. यावेळी परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
मात्र यामधील साहित्य जळून गेले होते. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होवून मालट्रकला आग लागली असावी, असा अंदाज आहे. मालट्रक पेटल्याने लागलेल्या आगीत लॅपटॉपसह इलेक्ट्रिक साहित्याचे लाखों रुपयांचे नुकसान झाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|