अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.
अहमदनगर जिल्ह्यातही सातत्याने रुग्ण वाढ कायम असून आजही तब्बल 1680 रुग्ण वाढले आहेत,दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे व मृत्यूचे प्रमाण ही वाढले आहे.
गेल्या २४ तासांत तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –
रात्रीची संचारबंदी :- राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 28 मार्चपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात निर्बंध कायम आहेत.
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की महाराष्ट्रासह पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये संसर्ग वाढत आहे. केंद्राच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि छत्तीसगडमध्ये 84.5 टक्के नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|