अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या प्रतिबंधात्मक तरतुदीमुळे मागील अनेक दिवस श्री.साईबाबांचे मंदिर बंद होते. त्यामुळे भाविकही येवू शकले नाहीत.
त्यामुळे या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेले सर्व व्यवसायांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवून शासनाने करमाफी द्यावी, अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
शिर्डी नगरपंचायतीच्या शिष्टमंडळाने आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून शिर्डी शहरातील नागरीक, व्यापरी आणि व्यावसायिकांच्या प्रश्नांसदंर्भात चर्चा केली.
या चर्चेत आ.विखे पाटील यांनी कोव्हीड संकटामुळे शहरातील कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेची गांभिर्यता मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. कोरोनाच्या महामारी काहीशी कमी झाल्यानंतर जिल्ह्यातील मंदिरे खुली करण्यात आली होती.
अनेक दिवसांनंतर मंदिर उघडले असले तरी, भाविकांची संख्या अत्यंत कमी आहे. याचा फटका शहरातील छोटे-मोटे व्यवसायीक, हॉटेल चालक यांना मोठ्या प्रमाणात बसल्याने या सर्वांवर आर्थिक संकट मोठे आले आहे.
त्यामुळे नगरपंचायतीने दिलेली कराची बिलही भरणे मुश्कील असल्याचे गांभिर्य डॉ.सुजय विखे पाटील यांनी बैठकीत नमुद केले.आर्थिक वर्षाअखेरीस करांच्या वसुलीवरही मोठा परिणाम झालेला आहे.
त्यामुळे शासनाने तातडीने करमाफी देण्याबाबत विचार करावा आणि मागणी शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|