अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांसह मृत्यूचा आकडा वाढल्याने चिंता वाढली आहे. नव्या रुग्णांचा आजही विस्फोट झाला असून एकूण 18०० नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असल्याचे दिसत आहे.
24 तासांमध्ये 1 हजार 800 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक 456 रुग्ण आढळले.
त्या खालाेखाल राहाता, श्रीरामपूर, नगर तालुका, कोपरगाव आणि पाथर्डी तालुक्यात रुग्णसंख्या शंभरच्या पुढे गेली आहे.
अहमदनगर शहर 456, राहाता 208, संगमनेर 71, श्रीरामपूर 134, नेवासे 72, नगर तालुका 107, पाथर्डी 136, अकाेले 62, काेपरगाव 110,
कर्जत 73, पारनेर 51, राहुरी 87, भिंगार शहर 81, शेवगाव 37, जामखेड 44, श्रीगाेंदे 36, इतर जिल्ह्यातील 35 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
जिल्हा रुग्णालयानुसार 434, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 882 आणि रॅपिड चाचणीमध्ये 484 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
आज अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –
राज्यात गुरुवारी तब्बल 249 कोरोना बळींची नोंद :- राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 हजार पार गेला आहे. गुरुवारी (1 एप्रिल, 2021) 43183 नवीन रुग्णांची नोंद झाली. यानंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28,56,163 वर पोहोचला आहे.राज्यातील गुरुवारी तब्बल 249 कोरोना बळींची नोंद झाली आहे. यापैकी 140 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत तर 109 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत, त्याची नोंद आता करण्यात आली. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
देशात दर मिनिटाला ५० पॉझिटिव्ह रुग्ण :- देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांचा आकडा ७२ हजार ३३० वर पोहोचला. ११ ऑक्टोबर २०२० रोजीनंतर प्रथमच एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधितांची नोंद झाली आहे. ४५९ बाधितांचा मृत्यू गेल्या २४ तासांत झाला असून ११६ दिवसांतला हा उच्चांक आहे.
ही आकडेवारी पाहता, देशात दर मिनिटाला ५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याचे दिसते. एकीकडे बाधितांची संख्या वाढत असताना ४५ वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली. बाधितांची संख्या सतत वाढण्याचा गुरुवारी सलग २२वा दिवस होता.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|