पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्याचा कोरोनाने मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-डीवायएसपी व्हायचं हे स्वप्नं घेऊन तो पुण्यात २०१४ मध्ये पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी गेला होता.त्याने याआधी अनेक परीक्षा देखील दिल्या होत्या. मात्र त्याचे हे स्वप्न स्वप्नच राहीलं.

कोरोनामुळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथील वैभव शितोळे याला जीव गमवावा लागला. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दिवसाला ४ ते ५ पाच हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी पुण्यात आहेत. त्यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच रुममध्ये अनेकजण राहत असल्याने एकमेकांना लवकर संसर्ग होतोय आणि त्यामुळेच आता विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात वैभव सहभागी झाला होता. आंदोलनानंतर तीन दिवसांनी त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तो रुग्णालयात दाखल झाला होता.

काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती परंतु शुक्रवारी त्याची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. वैभव विद्यार्थ्यांच्या मोर्चात सहभागी झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी त्याला श्वास घ्यायला त्रास झाल्याने तो ससून रुग्णालयात दाखल झाला.

त्याच्यावर तेथे उपचार सुरु होते. हळूहळू तो रिकव्हर होत होता. त्याला दुसरा कुठलाच त्रास नव्हता. परंतु अचानक त्याची तब्येत खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. २०१४ पासून तो पुण्यात तयारी करत होता.

त्याचं नाशिकला इंजिनिअरींग झालं आहे. आंदोलनानंतर झालेली परीक्षा त्याला देता आली नाही. त्याला एक बहीण आहे, आई-वडिलांना तो एकुलता एक होता. पुढच्या रविवारी परीक्षा असल्याने कोविडची लक्षणे दिसत असताना अनेक विद्यार्थी टेस्ट करत नाहीत.

आपल्याला क्वारंटाईन करतील, परीक्षा देता येणार नाही म्हणून विद्यार्थी गोळ्या घेऊन अंगावर काढत आहेत.

कोरोनाची लागण झाली तरी काळजी घेण्यासाठी कोणी नसल्याने आपलं कसं होणार अशी भीती अनेकांच्या मनात आहे. एकीकडे परीक्षा आहे तर दुसरीकडे वाढणारी रुग्णसंख्या त्यामुळे परीक्षा द्यावी की गावाकडे जावं या द्विधा मनस्थितीत सध्या अनेक विद्यार्थी आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe