श्रीरामपूर – भरधाव वेगातील महिंद्रा मॅक्स जीप चालकाने रॉंग साईटने जीप चालवून दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना श्रीरामपूर – निमगाव खैरी रस्त्यावर भैरवनाथनगर शिवारात फौजी हॉटेल समोर घडली.
भरधाव वेगातील महिंद्रा मॅक्स जीप नं. एमएच २३ – ४७५८ हिच्यावरील चालक आरोपीने हयगय व अविचाराने रॉंग साईटने जीप चालवून समोरुन येत असलेली हॉडा शाईन दुचाकीनं. एमएच १७ व्ही ९१९० हिला धडक देवून उडविले.
यात राजेंद्र गोरक्षनाथ वाघ, वय ४१ रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर हे ठार झाले. या अपघातप्रकरणी काल अशोक भास्कर वाघ रा. खैरी निमगाव यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांत जीप नं. ४७५८ हिच्यावरील चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीपवरील चालक आरोपी अपघात करुन पळून गेला. पोनि बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली हेका हापसे हे पुढील तपास करीत आहेत.