महत्वाचे मुद्दे
- इतिहासात तिस-यांदा मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद
- याशिवाय साईसंस्थानची भक्तनिवास व्यवस्थाही या काळात बंद
- प्रसादालय व कॅन्टीन सुद्धा बाहेरून येणा-या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय
- प्रसादालयात केवळ रूग्णालय व कोवीड सेंटरच्या रूग्णांसाठीच जेवण बनवले जाणार
अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- आज, सोमवार सायंकाळपासून ते ३० एप्रिलपर्यंत साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे.
इतिहासात तिस-यांदा मंदीर बंद :- साईसंस्थानच्या इतिहासात साथीचा संसर्ग रोखण्यासाठी तिस-यांदा मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे. १९४१ मध्ये कॉलराचा संसर्ग रोखण्यासाठी मंदीर ऐन रामनवमीत बंद ठेवण्यात आले होते.शिर्डीत आलेल्या भक्तांना लस टोचण्यात आली. बाहेरून येणाºया भाविकांना पोलीसांनी शिर्डीच्या शिवेवर अडवून तेथूनच परत पाठवले जात होते.
कोरोनाचा संसर्ग सुरू होताच बंद झाले :- २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू होताच १७ मार्च २०२० रोजी दुपारी तीन वाजेपासून १५ नोव्हेंबर २०२० रात्री पर्यंत मंदीर बंद ठेवण्यात आले.१६ नोव्हेंबरला मंदीर पुन्हा सुरू झाल्यानंतरही २३ फेब्रुवारी २०२१ पासुन दर्शनाच्या वेळा सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत कमी करण्यात आल्या. यामुळे पहाटेची व रात्रीची आरती भक्ताविना होवू लागली.
शासनाच्या ब्रेक दि चेन धोरणानूसार पुन्हा मंदीर बंद :- कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून २८ मार्च २०२१ पासुन वेळेत आणखी कपात करून दर्शनाची वेळ सकाळी सव्वा सात ते रात्री पावणे आठ करण्यात आली. यानंतर आज, सोमवारी रात्री आठ वाजेपासून शासनाच्या ब्रेक दि चेन धोरणानूसार पुन्हा मंदीर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|