नगरकरांचा विश्वास उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारा ठरेल : जगताप

Ahmednagarlive24
Published:

नगर –  मोठ्या मताधिक्याने माझी आमदारपदी पुन्हा एकदा निवड करून, आपण माझ्या विकासकामरुपी प्रयत्नांच्या प्रकाशाला साथ दिली आहे. 

मतदानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास, नगर शहराच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारा ठरणार आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. 

स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र देऊन आमदार जगताप यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी एड. प्रसन्ना जोशी, शिवम भंडारी, चेतन देवतरसे, स्वदीप खराडे उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, शहरातील विविध परिसरात महिलांसाठी स्वछतागृह, महिला बचत गटांना प्रोत्साहन, या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मानस आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment