अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा विस्फोट सुरूच! आज तब्बल 2000+ रुग्णांची भर वाचा सविस्तर अपडेट्स

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक असल्याचं दिसून येत आहे. जिल्ह्यासह शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढत असून आज तब्बल 2 हजार 20  नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत – 

नगर शहरातील बाधितांचा आकडा आजही 600 च्या पुढे गेला आहे. नगर शहरात 622 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. त्या खालोखाल श्रीरामपूर, राहाता, नगर तालुका, संगमनेर, अकोले, पाथर्डी आणि कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

अहमदनगर शहर 622, राहाता 214, संगमनेर 205, श्रीरामपूर 105, नेवासे 52, नगर तालुका116, पाथर्डी 117, अकाेले 161, काेपरगाव 106, कर्जत 05, पारनेर 47, राहुरी 90, भिंगार शहर 45, शेवगाव 65, जामखेड 18, श्रीगाेंदे 10, इतर जिल्ह्यातील ३९,

इतर राज्यातील 02 आणि मिलिटरी हॉस्पिटलमधील 01 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 763, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 860 आणि रॅपिड चाचणीमध्ये 397 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe