अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-घरगुती वादातून एका विवाहित महिलेने आठ महिन्याच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील चुंबळी येथे घडली आहे.
याप्रकरणी जामखेड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड शहरापासून नजीकच्या अंतरावर असलेल्या
चुंबळी येथील ईश्वर हुलगुंडे याचा पाथर्डी तालुक्यातील खोपटी गावातील राधा हिच्याबरोबर दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता.
त्यांना आठ महिन्याचा राम नावाचा मुलगा आहे. घरगुती वादातून रागाच्या भरात मंगळवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता राधा ईश्वर हुलगुंडे (वय २२) हिने आठ महिन्याच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
याबाबत जामखेड पोलिसांना पीडित मुलीचे सासरे बारीकराव हुलगुंडे यांनी खबर दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन
मयत महिला राधा व आठ महिन्याचा मुलगा राम यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. मयत मुलीच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस ठाण्यात केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|