अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- एप्रिल महिना अहमदनगरकरांसाठी अंगावर काटा आणणारा ठरला असून, याचे कारण म्हणजे गेल्या महिनाभरात जिल्ह्यात झालेला कोरोनाचा फैलाव आहे.
या महिन्यात आढलेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्याही सर्वाधिक ठरली.जिल्ह्यात सातत्याने मोठ्या संख्येने रुग्ण वाढ होते आहे. सरासरी दीड ते दोन हजार कोरोनाबाधित रोज आढळले आहेत.
आज तब्बल 2233 रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात वाढले आहेत तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे –
नगर शहरात 611 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठाेपाठ कर्जतमध्ये दाेनशेच्या पुढे रुग्ण वाढले आहे. त्यानंतर संगमनेर, नगर तालुका, अकाेले, राहाता, पाथर्डी, राहुरी आणि शेवगाव तालुक्यातील रुग्णांची संख्या शंभच्या पुढे गेली आहे.
अहमदनगर शहर 611, राहाता 117, संगमनेर 198, श्रीरामपूर 79, नेवासे 55, नगर तालुका 187, पाथर्डी 117, अकाेले 128, काेपरगाव 99, कर्जत 201, पारनेर 70, राहुरी 107, भिंगार शहर 54, शेवगाव 103, जामखेड 47, श्रीगाेंदे 40,
इतर जिल्ह्यातील 17 आणि मिलिटरी हॉस्पिटलमधील 06 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 859, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 549 आणि रॅपिड चाचणीमध्ये 825 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|