जामखेड :- मतदारसंघात एकीकडे पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्या मिरवणुकीवरील उधळपट्टी हा चर्चेचा विषय झाला होता मात्र आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या विजयी मिरवणुकीत गालबोटही लागल्याचेही समोर आले आहे. हृदयविकाराचा झटका बसलेल्या आईला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या लेकरास तुरुंगात जावे लागले आहे.
रस्ता मोकळा करून देण्याचे सोडून पोलिसांनी रुग्णवाहिकाच अडविण्याचे पाप केले. त्याचा जाब विचारणाऱ्या लेकरालाही पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी तुडवत जेलची हवा खायला भाग पाडले.
आमदार रोहित पवार यांच्या मिरवणुकीत हा संतापजनक प्रकार घडला असून, त्या तरुणाचे नाव नागेश गवळी असून तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा स्वीय सहाय्यक आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार यांनी मंत्री राम शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. निवडून आल्यानंतर ते प्रथमच आले होते. तालुक्यात विविध ठिकाणी त्यांचा सत्कार झाला. शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
प्रत्येक चौकात जेसीबी उभा करण्यात आला होता. अशा ३० जेसीबींमधून गुलाल उधळण्यात येत होता. पोकलेनमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने मोठे हार घालण्यात आले.
तरुणाईचा जोश, ढोलताशांचा धडाका आणि प्रचंड गर्दीत जामखेडमध्ये ही मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत जेसीबी मिशिन्सच्या साह्याने गुलाल उधळण्यात आला. हा गुलाल उधळण्यासाठी तब्बल 28 जेसीबी मिशिन्स सर्व शहरातल्या चौकात लावण्यात आल्या होत्या.
पाच तास चाललेल्या या मिरवणुकीत दुपारी तीनच्या सुमारास रॅलीतून जाणाऱ्या एक चारचाकी वाहन पोलिसांनी अडविले. त्या वाहनात ५५ वर्षांच्या महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याने दवाखान्यात चालविले होते.
नागेश गवळी हा याने आईला दवाखान्यात घेऊन जायचे आहे, मला जाऊ द्या, अशी विनंती केली. मात्र, पोलिसांनी त्याला मारहाण केली. काठी पकडल्याचा राग अनावर झाल्याने पोलिसांनी त्याला लाथाबुक्क्यांनी तुडविले.
त्यामुळे गवळी यांनीही पोलिसांना धक्काबुक्की केल्याचेही समोर येत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी वाहनातील तिघांपैकी नागेश अशोक गवळी व अशोक मारूती गवळी यांना अटक केली.
दरम्यान, आजारी असणारी आई धायमोकळून रडत होती. आजारी आईसमोर तिच्या मुलाला मारहाण होत असल्याने तिनेही पोलिसांना विनंती केली.
मात्र, पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवायचे बंद केले नाही. उलट नागेश व त्याचे वडील अशोक गवळी यांना ताब्यात घेऊन शासकीय कामात अडथळा व पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल केला.
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार