अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या संकटात अनेक गोरगरीब रुग्ण मिळेल त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
काही हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर इमानदारीत डॉक्टर उपचार करत आहेत तर काही हॉस्पिटलमध्ये गोरख धंदा सुरू आहे,
अनेक रुग्ण मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत अशाच वेळी रेमडिसेवीर हे इंजेक्शन एक जीवन वाचविणार औषधं म्हणून कामाला येत आहे.
परंतु त्याचा काळाबाजार सुरु असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात सुरु आहे. राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे
त्यामुळे रुग्णांना आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सेवा देखील आता कमी पडत आहेत कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरणारे रेमडिसेवीर इंजक्शनचा तुटवडा आता राज्यात जाणवू लागला आहे.
रेमडीसीवर इंजक्शन तुटवड्याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की,दररोज पन्नास हजार इंजक्शन उपलब्ध होत आहेत ते सर्व इंजक्शन वाटप होत आहेत तरीदेखील इंजक्शन कमी पडत आहेत.
रेमडीसीवर इंजक्शन हे कोरोना रुग्णांना बरे करण्यात सिंहाचा वाटा उचलत आहे हे इंजक्शन कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरत असतानाच आता त्याचाच तुटवडा निर्माण झाल्यामुळे चिंता वाढली आहे.
दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेडिकल स्टोअरमध्ये याच इंजेक्शनचा साठा करून ते अव्वाच्या सव्वा भावात अर्थात एक इंजेक्शन 8 ते 10 हजार रुपयाला विकत आहे.
या औषधाचा काळाबाजार करणाऱ्या मेडिकलवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करू लागले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|