अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची विक्रमी रुग्णवाढ कायम आहे गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल 2414 रुग्ण वाढले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत जिल्हा रुग्णालयानुसार 902, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 412 आणि रॅपिड चाचणीमध्ये 1100 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे –
नगर शहरात 531 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठाेपाठ श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यात दोनशेच्या पुढे, तर काेपरगाव, अकाेले, पारनेर, कर्जत, राहुरी, नगर तालुक्यातील रुग्णांची संख्या शंभरच्या पुढे गेली आहे.
अहमदनगर शहर 531, राहाता 281, संगमनेर 70, श्रीरामपूर 243, नेवासे 65, नगर तालुका 198, पाथर्डी 59, अकाेले 171, काेपरगाव 110, कर्जत 135, पारनेर 137,
राहुरी 154, भिंगार शहर 87, शेवगाव 71, जामखेड 49, श्रीगाेंदे 43, इतर जिल्ह्यातील 04आणि मिलिटरी हॉस्पिटल 06 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विषाणूवर मात करण्यासाठी राज्यात अनेक निर्बंध लादण्यात आले. शिवाय नाईट कर्फ्यूही लागू आहे.
शनिवार आणि रविवारी राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन आहे. कोरोना महामारीला रोखण्यासाठी सर्वप्रकारची खरबदारी घेतली जात आहे. पण, तरीही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
(ही बातमी आताच ब्रेक झाली आहे अपडेट होत आहे कृपया थोड्यावेळाने पेज रिफ्रेश करा)













