निदान ‘या प्रश्नी’ तरी जनतेच्या भावनांशी खेळू नका! ‘या’ जि.प.सदस्याचे तालुक्यातील नेत्यांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- कुकडीचा पाणी प्रश्न हा अनेक वर्षापासून जैसे थेच आहे. कुकडीच्या आवर्तनात श्रीगोंदेकरांवर नेहमीच अन्याय होत आहे.

तालुक्यातील सर्व जेष्ठ नेतेमंडळी हा प्रश्न सोडवतील असा आपल्याला विश्वास होता. परंतु प्रत्यक्षात मात्र याप्रश्नावर नेतेमंडळी फक्त टाईमपास करत आहेत. विविध मंत्र्यांना निवेदन दिल्याचे फोटो प्रसिद्ध करून केवळ पत्रकबाजी करून फक्त प्रसिद्धी मिळवत आहेत.

परंतु कुकडीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपण तालुक्यातील महिलांना,तरुणांना सोबत घेऊन आता मंत्रालयस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सदस्या अनुराधा नागवडे यांनी सांगितले.

नागवडे कारखान्यावर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना नागवडे म्हणाल्या की,तालुक्यातील नेत्यांनी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये पक्षभेद,राजकारण बाजूला ठेवून पाणीप्रश्नावर एकत्र याव.

नागवडे यांच्याकडे यायला काहींना अडचण असेल तर तुम्ही सांगा आम्ही तिथं येऊ, पण कुकडी पाणीप्रश्न सोडवावा लागेल. या प्रश्नी जनतेच्या भावनांशी खेळू नका असे सांगत पाणीप्रश्नी राजकारण करणाऱ्यांचा नागावडे यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला.

तसेच पाणीप्रश्नी आपल्यासोबत तालुक्यातील सर्व नेत्यांनी एकत्र यावे अशी माझी अपेक्षा आहे जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आपण आता या प्रश्नासाठी लढा देणार असल्याचे नागवडेंनी सांगितले.

तसेच इतर तालुक्यांमध्ये मोठे कोव्हिड सेंटर उभे राहत असतानाच श्रीगोंद्यात कोव्हिड सेंटर उभारण्याबाबत राजकीय नेते मात्र उदासीन असल्याबाबत खंत व्यक्त केली.

शासकीय कोव्हिड सेंटरसाठी छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जागा उपलब्ध करून देणार असून, काही दिवसातच याठिकाणी २५०बेडचे कोव्हिड सेंटर सुरू होईल. असेही नागवडे यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|