अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहसाखर कारखाना आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कोविड केअर सेंटरचे उदघाटन राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले.
सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या प्रयत्नातून श्रीगोंदा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी ना.थोरात यांनी बोलताना सांगितले की, कोरोनाची राज्यात परिस्थिती गंभीर असून दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत असून, नागरिकांनी गाफील न राहता आपली स्वत:ची कुटुंबाची काळजी घ्या, असे सांगितले.
नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी सांगितले की तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी जवळ जवळ ३०० बेड चे सेंटर सुरू केले असून, लवकरच यातील ५० बेड ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करु असे सांगितले.
याप्रसंगी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दिपक भोसले पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा बँकेच्या संचालक अनुराधा नागवडे, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, बाबासाहेब भोस,मनोहर पोटे, युवा अध्यक्ष स्मितल वाबळे, प्रशिक्षणार्थी प्रांत दाभाडे मॅडम,
श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार, नागवडे कारखान्याचे सर्व संचालक, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.नंदकुमार पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी मानले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|