अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-अहमदनगर, बीड जिल्ह्यात खून तसेच दरोडा यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या कुख्यात टोळीतील आकाश ऊर्फ राजेंद्र हाम्या चव्हाण (रा. वलघुड) याला श्रीगोंदे पोलिसांनी पेडगाव शिवारात कोंबिंग ऑपरेशन करत ताब्यात घेतले.
नगर तालुका पोलिस स्टेशन हद्दीत २००३ साली खून करून फरार झालेला अट्टल गुन्हेगार आकाश ऊर्फ राजेंद्र हाम्या चव्हाण रा. वलघुड, ता. श्रीगोंदे हा पेडगाव शिवारात आला अाहे, अशी माहिती श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले
यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना योग्य त्या सूचना देऊन कोंबिंग ऑपरेशन राबवत अट्टल गुन्हेगार आकाश ऊर्फ राजेंद्र हाम्या चव्हाण याला ताब्यात घेतला.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने नगर, श्रीरामपूर, बीड पोलिस स्टेशन हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले,
पोलिस उपनिरीक्षक रणजित गट, पोलिस हेडकॉन्स्टेबल अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, गोकूळ इंगवले, पोलिस कॉन्स्टेबल दादा टाके, पोलिस कॉन्स्टेबल किरण बोराडे यांनी केली.
आकाश ऊर्फ राजेंद्र हाम्या चव्हाण याला ताब्यात घेतला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने नगर, श्रीरामपूर, बीड पोलिस स्टेशन हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|