अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यास सुरुवात करण्यात आली.
पहिल्याच दिवशी निमगाव वाघा व नेप्ती येथील दीडशे ग्रामस्थांचे कोरोना लसीकरण करण्यात आले.
आरोग्य पर्यवेक्षक राहुल कोतकर यांनी कोरोना लसीचा लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सचिन कळमकर,
ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, पै.अनिल डोंगरे, पिंटू जाधव, आरोग्य सेवक निलेश हराळ, सलीम पठाण, मदतनीस रेखा ठोंबरे, संगीता आतकर, अलका कैतके आदी उपस्थित होते.
आरोग्य अधिकारी डॉ. सचिन कळमकर यांनी कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असताना कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेची झाली असल्याचे सांगून, ग्रामस्थांना लसीकरणाची माहिती देऊन निर्माण झालेला गैरसमज दूर केला.
पै. नाना डोंगरे यांनी कोरोना महामारीशी लढण्यासाठी लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. सरकारने 18 वर्षावरील युवकांना देखील 1 मे पासून लसीकरण करण्यास परवानगी दिली असून, युवकांनी देखील मनात भिती न बाळगता आपल्या कुटुंबीयांच्या निरोगी अरोग्यासाठी हे लसीकरण करण्याचे आवाहन केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|