नागरिकांनी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये : नगराध्यक्ष तांबे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोनामुळे घसा खवखवणे, सर्दी, कोरडा खोकला, जुलाब, बारीक ताप आदी आजाराची लक्षणे वाटल्यास नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केले.

तांबे म्हणाल्या, जगभर कोरोणाची दुसरी लाट आली आहे. राज्यात यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे.

संसर्गामुळे नागरिकांना बारीक ताप येणे, थकवा जाणवणे, अंग दुखणे, पाय दुखणे, घसा दुखणे अशी काही लक्षणे येऊ शकतात.

लक्षणे आढळल्यास प्रत्येकाने निष्काळजीपणा न करता तातडीने जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनासह शहरपालिका, विविध सहकारी संस्था अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यरत आहे.

घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टकडून मेडिकल मॅनेजमेंट सेवा पुरवली जाते.

तसेच सर्व कोविड सेंटरमध्ये काळजी घेतली जात आहे. पालिकेने आझाद मंगल कार्यालयात ३५ ऑक्सिजन बेडची सोय केली, असे नगराध्यक्ष तांबे यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe