अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- जगावर ओढवलेले कोरोना नावाचे संकट आजही कायम आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद होत असून यातच नगर जिल्हाही आघाडीवर आहे.
दरदिवशी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. याहूनही भयाण परिस्थिती म्हणजे दरदिवशी अनेकांचे मृत्यू होत आहे.

यातच रुग्ण जगण्यासाठी संघर्ष करत असतो मात्र नियतीशी हरलेला पीडित मरणानंतरही त्याच्या यातना काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे.
शहरातील अमरधाममधील अग्नितांडव हा दिवसेंदिवस ज्वलन्त राहू लागला आहे. जिल्ह्यात दररोज45 ते 55 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत रांगा लागल्या आहेत.
एकाच वेळी होत असलेल्या एवढ्या मुत्यूमुळे स्मशानभूमीसुद्धा अपुरी पडू लागली आहे. अहमदनगर मध्ये तर एका स्मशानभूमीत एका दिवसाला तब्बल 50 ते 55 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आला.
ही सारी दृश्य मन हेलावून टाकणारी आहे. पण हे वास्तव आहे याला आता नाकारता येणार नाही.
जिल्हयात मागच्या काही दिवसांपासून तीन हजार पेक्षा जास्त कोरोना बाधितांची नोंद होत आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा आता बऱ्याच प्रमाणात वाढली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|