अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्याला रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा वाढवून देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे नेते संभाजी कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कदम यांनी म्हटले आहे की, नगर जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा देखील अल्प आहे. नगरच्या प्रशासनाने इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्यांंकडून त्यांचे नियोजन म्हणावे असे दिसत नाही.
त्यामुळे वितरण जलद गतीने कशा प्रकारे होईल यासाठी संबधितांना त्वरित आपल्या पातळीवरून आदेश व्हावेत.
नगर जिल्ह्यात रोजची रेमेडेसिवीरची आवश्यकता ६००० आहे. जिल्ह्याला फक्त १००० ते १२०० चा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|