माझ्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करावाच !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापे भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून मारले होते.

या विधानावरून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पाटील यांच्या विधानावर आज राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आजच्या आज माझ्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करावा, असे आव्हान मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेद्वारा दिले आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय’ने गुन्हा नोंद केला होता.

तसेच सीबीआय’ने त्यांच्या मुंबई, नागपूर येथील घरी व कार्यालयावर छापे मारले होते. हे छापे भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून मारण्यात आले होते असे विधान मुश्रीफ यांनी केले होते. छापा प्ररकरणावरून चंद्रकांत पाटील व मुश्रीफ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

मुश्रीफ म्हणाले, परमवीर सिंग आरोप करतात, दिल्ली येथे वरिष्ठ यंत्रणांची भेट घेतात, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लगेच केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय सचिव यांची रातोरात भेट घेतात, त्यानंतर लगेच एनअायएकडे तपास जातो, याचा अर्थ काय, अशी विचारणा त्यांनी केली.

यापूर्वीही अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News