बाबो : गुप्तधनासाठी पुरातन वाड्यात खोदकाम;मात्र?

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-एकविसाव्या शतकात देखील अंध्दश्रध्देपोटी अनेक अघोरी प्रकार केले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच प्रकार श्रीगोंदा शहरात घडला आहे.

शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका तब्बल तीनशे वर्ष जुन्या वाड्यात अज्ञात व्यक्तींनी गुप्तधनासाठी खोदकाम केल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले.

हा प्रकार लक्षात आल्यावर हे खोदकाम करणारे पळून गेले. गुप्तधन काढण्यासाठी वाड्यतील खोदकामाच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. श्रीगोंदा शहर पुरातन असून या ठिकाणी अनेक जुने वाडे असून, शहराला ऐतिहासिक संदर्भ आहे.

शहरात असलेले चिरेबंदी वाडे हे धनिक व्यक्ती, तत्कालीन सैन्यातील सरदार यांचे असुन काळाच्या ओघात हे वाडे बंद अवस्थेत असून अनेक पडझड देखील झाली आहे. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या

या भग्न वाड्यात कुणाचीही वर्दळ नसल्याचा फायदा अज्ञात व्यक्तीनी घेत सबंधित वाड्यातील देवघराच्या बाजूने खोदकाम करण्यास सुरुवात केली होती. मात्र स्थानिकांकडून याबाबत विचरणा झाल्यावर खोदकाम करणारे पळून गेले.

खोदकाम करण्यापूर्वी या ठिकाणी हळद, कुंकू, गुलाल, अगरबत्ती लावून पूजा देखील करण्यात आली होती.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe