प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शेवगाव तालुक्यात पथकाकडून रुग्णालयांच्या तपासण्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-शेवगाव नगरपरिषदने शहरातील खासगी कोविड सेंटरची तपासणी करून हॉस्पिटलमध्ये आढळून आलेल्या त्रुटी व करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात संबंधित हॉस्पिटल प्रशासनाला लेखी सूचना कळविल्या आहेत.

नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी शहरातील सर्व कोविड सेंटरची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार शहरातील बडे हॉस्पिटल, आधार हॉस्पिटल, श्री साई कोविड हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल येथे जाऊन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, नितीन बनसोडे,

सोमनाथ नारळकर, प्रशांत सोनटक्के आदींनी तपासणी केली. नगरपरिषद पथकाने तपासणी करताना हॉस्पिटल इमारत सुस्थितीत आहे का?

जनरल बेड व ऑक्सिजन बेडची संख्या किती? रिकामे व भरलेली ऑक्सिजन सिलिंडर संख्या, ऑक्सिजन स्टोअरेज टँक सिलिंडर,

पाईपलाईन आदींची पाहणी करून अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना यावेळी दिल्या आहेत.

यावेळी पाहणीत त्यांना आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात हॉस्पिटल प्रशासनाला लेखी कळविले आहे. तसेच तत्काळ फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट संबंधित अधिकृत एजन्सीमार्फत पाच दिवसांच्या आत करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe