पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून दीड लाखांची दारू केली जप्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कर्जत पोलीस पथकाने अवैध दारू विक्री करणाऱ्या तालुक्यातील वेगवेगळ्या ११ ठिकाणी छापे टाकून १ लाख ५५ हजार ८७० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांनी दिली.

दरम्यान पोलिसांनी तालुक्यामधील केलेल्या कारवाईचा आढावा पुढीलप्रमाणे आहे. जाफर बंडूभाई शेख (रा. बेलवंडी), महादेव लक्ष्मण नवले (रा. चांदा), किरण रघुनाथ गंगावणे (रा. चांदा),

भरत चद्रकांत घालमे (रा. शिंदा), जयश्री हनुमंत पवार (रा. कर्जत), राजेंद्र विश्वनाथ भोसले (रा. टाकळी खंडेश्वरी), इस्राईल शब्बीर पठाण (रा. टाकळी खंडेश्वरी), शालन सोनबा शिंदे (रा. जलालपूर), आकाश सुनील मांडगे (रा. रेहेकुरी),

महेश अरुण गोडसे (रा. जोगेश्वरी वाडी), गंगाराम सर्जेराव आडगळे (रा. रवळगाव). इत्यादी ठिकाणी छापे टाकून दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान हि कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, सलीम शेख,

तुळशीराम सातपुते, प्रल्हाद लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे, गोवर्धन कदम, श्याम जाधव, भाऊसाहेब काळे, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, तिकटे, पोलीस कॉन्स्टेबल कोमल गोफणे, पो.ना. जयश्री गायकवाड यांनी ही कारवाई केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe