वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत बुथ हॉस्पिटलला आथिर्क मदत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत बूथ हॉस्पिटलला आथिर्क मदतीचा धनादेश हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सोमा शिंदे, अंकुश मोहिते, रोहित कटारिया, ऑक्सीजन प्लांटचे संचालक रमेश लोढा, निलेश बांगरे, रवी ठाकूर, संजू दिवटे, सतीश साळवे, गिरीश गायकवाड, रोहित केदारे, येशुदास वाघमारे, आनंद सकट, दीपक सरोदे, निलेश पाटोळे, अक्षय कराळे, योगेश बटे, महेश आठवले आदी.

यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे म्हणाले की वाढदिवसाचा वायफट खर्च न करता बुथ हॉस्पिटलच्या कार्याचे त्यानी कौतुक करुन, या संकटकाळात हॉस्पिटलचे कर्मचारी मानवरुपी ईश्‍वरसेवा करीत आहे.

कठिण काळात नगरकरांना बुथ हॉस्पिटलने मोठा आधार दिला. सध्या रुग्णांची संख्या वाढत असताना काळजी घेण्याचे आवाहन केले तर गोरगरिब रुग्ण या हॉस्पिटलकडे नेहमी आशेने पाहत असतात व त्या अपेक्षेला हे हॉस्पिटल खरे उतरत असल्याचे त्यांनी सांगितले.

या संकटकाळात इतर हॉस्पिटलची वेगळी परिस्थिती असून, या सेवाभावी हॉस्पिटलला मदत करण्यास पुढे येण्याचे त्यांनी आवाहन केले. सामाजिक भावनेने केलेल्या सहकार्याबद्दल हॉस्पिटलचे कळकुंबे यांनी आभार मानले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe