हॉस्पिटल मध्ये दुर्दैवी घटना घडू नये याकरिता स्ट्रक्चर, फायर, ऑक्सिजन ऑडिट करण्याची मागणी.

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आहे महामारीत प्रचंड प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण व मृतांची संख्या वाढत आहे मुंबई ठाणे येथील विरार व नाशिक येथील कोविड हॉस्पिटल मध्ये झालेल्या घटनेच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात सर्व कोविड सेंटर व हॉस्पिटलची पाहणी करून

तेथे हॉस्पीटलचे स्ट्रक्चर, फायर, ऑक्सिजन, ऑडिट करण्याची मागणी विश्‍व मानव अधिकार परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी विश्‍व मानव अधिकार परिषदेचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अल्ताफ शेख समवेत प्रदेशाध्यक्ष नावेद शेख,

जिल्हा अध्यक्ष अज्जू शेख, शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उजागरे, जिल्हा युवक अध्यक्ष शहजाद खान, जिल्हा उपाध्यक्ष अरुण कोंडके, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक शहानवाज शेख, जिल्हा महासचिव शादाब कुरेशी आदी उपस्थित होते.

अहमदनगर शहरातील संपूर्ण कोविड हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारे दुर्दैवी घटना घडू नये यासाठी विश्व मानव अधिकार परिषदेच्यावतीने स्ट्रक्चर, फायर, ऑक्सिजन, ऑडिट करण्यात यावे व जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावा जेणेकरून हॉस्पिटलचे स्ट्रक्चर फायर,

ऑक्सिजन त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे की नाही हे महानगर पालिका अग्निशमन विभागाचे प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली पाहणे गरजेचे आहे तरी याचे ऑडिट होणे गरजेचे आहे व कोणत्याही हॉस्पिटल मध्ये दुर्दैवी घटना घडू नये याकरिता मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News