अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २५६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६३ हजार २५२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.३० टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३९६३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३ हजार ७५१ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९६२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१६० आणि अँटीजेन चाचणीत ८४१ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४८, अकोले ०१, जामखेड १५२, कर्जत ०३, कोपरगाव ३०, नगर ग्रामीण ८१, नेवासा ७३, पारनेर ५५, पाथर्डी ७१, राहता ६७, राहुरी १००, संगमनेर ६१, शेवगाव १३१, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर २२, कॅंटोन्मेंट बोर्ड ४२, मिलिटरी हॉस्पिटल ०७ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४९२, अकोले ४४, जामखेड १८, कर्जत १५, कोपरगाव ९१, नगर ग्रामीण २५५, नेवासा ९९, पारनेर १२६, पाथर्डी ३३, राहाता १९८, राहुरी ८८, संगमनेर २०१, शेवगाव ७७, श्रीगोंदा ५२, श्रीरामपूर २५४, कॅंटोन्मेंट बोर्ड २५ आणि इतर जिल्हा ८७ आणि इतर राज्य ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ८४१ जण बाधित आढळुन आले. मनपा ८३, अकोले ०५, जामखेड ०४, कर्जत ०९, कोपरगाव १२४, नगर ग्रामीण ७८, नेवासा ६३, पारनेर १२८, पाथर्डी १५, राहाता ५४, राहुरी १२९, संगमनेर २६, शेवगाव ०९, श्रीगोंदा ८०, श्रीरामपूर २१, कॅंटोन्मेंट ०३ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५७८, अकोले ११४, जामखेड ८६, कर्जत १०६, कोपरगाव ११९, नगर ग्रामीण १९१, नेवासा १०९, पारनेर १०६, पाथर्डी ९७, राहाता ३०१, राहुरी २१५, संगमनेर १४०, शेवगाव ६७, श्रीगोंदा १५८, श्रीरामपूर १३८, कॅन्टोन्मेंट १८ आणि इतर जिल्हा २३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या:१,६३,२५२
- उपचार सुरू असलेले रूग्ण:२३७५१
- मृत्यू:२१६४
- एकूण रूग्ण संख्या:१,८९,१६७
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|