अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने हाहाकार घातला आहे. जिल्ह्यातील असे एकही ठिकाणी नाही किंवा गाव नाही जिथे कोरोनाने आपले पाय पसरले नसतील.
मात्र जिल्ह्यातील एक असे ठिकाण आहे जीतही या महाभयंकर विषाणूला आपले स्थान निर्माण करता आले नाही. ते ठिकाण म्हणजे ऊसतोडणी मजुरांचे फड…
अकोले तालुक्यात अगस्ती कारखान्यावर ऊस तोडणीसाठी आलेले आठ हजार कामगार व त्यांच्या कुटुंबात सहा महिन्यांत एकही कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला नाही. कोतूळ येथे ५० कुटुंबांत मिळून १५० लोक ऊस तोडणीसाठी सहा महिन्यांपासून राहतात.
दरम्यान कोरोनाने या गावात शिरकाव केल्याने कोतूळात कोरोनाने एका महिन्यात बारा लोकांचे प्राण गेले आहे. मात्र विशेषबाब म्हणजे याच गावात सहा महिने राहणाऱ्या ऊस तोडणी कामगारांपैकी एकही बाधित नाही.
किंबहुना कोरोनाला या मजुरांनी आपल्याकडे एन्ट्रीच करू दिली नसल्याची दिलासादायक परिस्थिती दिसून येत आहे. अगस्तीच्या कोतूळ, अकोले, इंदोरी, कळस, देवठाण, टाकळी, उंचखडक,
सुगाव या सर्व ठिकाणी सहा हजार कामगार व कुटुंबातील लहान मुले वृद्ध असे आठ हजार लोक ऊस तोडणी व वाहतूक काम करतात.
सहा महिन्यांत ऊस तोडणी कामगारांत एकही बाधित निघाला नाही, असे कोतूळ येथील ऊस तोडणी कामगार रावसाहेब चरणदास पवार, राहुल कैलास चव्हाण, ईश्वर सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|